News Flash

विराटने पुन्हा ऑस्ट्रेलियात जिंकायला हवं, सौरव गांगुलीने व्यक्त केली इच्छा

वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्व क्रिकेट सामने बंद आहेत. वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत निव्वळ चांगली कामगिरी न करता जिंकणं गरजेचं असल्याचं मत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केलं. यासंदर्भात आपलं विराटशी बोलणंही झाल्याचं गांगुली म्हणाला.

“विराटशी माझं बोलणं झालं त्यावेळी मी त्याला म्हणालो, तू विराट कोहली आहेस त्यामुळे तुझ्याकडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत. ज्यावेळी तू संघासोबत खेळायला मैदानात उतरतोस, मी तुम्हाला टिव्हीवर पाहत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगला खेळ करावा अशी माझी अपेक्षा नाही, तिकडे जाऊन तुम्ही जिंकायला हवं.” इंडिया टुडेशी बोलताना गांगुलीने माहिती दिली. विराटने त्याच्याबद्दलच्या अपेक्षा इतक्या उंचावून ठेवल्या आहेत की आता त्याने त्या लौकिकाला साजेसा खेळ करावा अशी सर्वांची इच्छा असल्याचं गांगुली म्हणाला.

विराटला फिट राहणं गरजेचं असल्याचंही गांगुली म्हणाला. गेले काही महिने विराट सराव करत नाहीये, कोणत्याही जलदगती गोलंदाजाचा सामना करताना विराटने दुखापतग्रस्त होऊ नये अशी माझी इच्छा आहे. यंदाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही खडतर असणार आहे. २०१८ साली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात गेला त्यावेळचा ऑस्ट्रेलिया संघ आणि आताचा ऑस्ट्रेलिया संघ यात फरक असेल. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करावा अशी इच्छा गांगुलीने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 6:43 pm

Web Title: sourav ganguly to virat kohli i expect you to win in australia psd 91
Next Stories
1 Video : अजब गजब रन-आउट! तुम्हालाही आवरणार नाही हसू
2 धर्मामुळे मला राजीनामा द्यायला भाग पाडलं, हॉकी इंडियाचे माजी अध्यक्ष मुश्ताक अहमद यांचा आरोप
3 क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात, प्रक्षेपणाचे तीन-तेरा; पाक खेळाडूंवर इंग्लंडमध्ये लॉजवर राहण्याची वेळ
Just Now!
X