Asia Cup 2018 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आज आमनेसामने येणार आहेत. तब्बल १५ महिन्यांच्या नंतर हे दोन संघ आपसात भिडणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दारुण पराभव पत्करल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान बुधवारी एकमेकांसमोर उभे ठाकतील, तेव्हा संपूर्ण विश्वाचे लक्ष या सामन्याकडे वेधले जाईल. प्रत्येकजण हा सामना बघण्यासाठी उत्सुक आहेच. पण एक विशेष व्यक्ती हा सामना पाहण्यासाठी आज स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय संबंध तणावपूर्ण आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे संघ आयसीसीच्या स्पर्धांव्यतिरीक्त एकमेकांशी खेळत नाहीत. याचे विशेष दडपण दोनही संघांच्या खेळाडूंवर असेल. त्यामुळे या सामन्याला क्रिकेटच्या व्यासपीठावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे हा सामन्याला हजेरी लावण्यासाठी दुबईत हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इम्रान खान हे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा पहिला परदेश दौरा आहे. आणि या दरम्यान आज भारत – पाकिस्तान सामना रंगनर आहे त्यामुळे ते या सामन्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. २००६ सालानंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तान युएईमध्ये खेळणार असल्याने तेथील स्थानिकही मोठ्या प्रमाणावर या सामन्याला हजेरी लावणारा असल्याचे नक्की आहे.