ट्वेन्टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासात तीव्र चढ-उतार होत आहेत. सलामीच्या लढतीत श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोमहर्षक लढतीत त्यांनी न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवला. कामगिरीत सातत्यासह विजयाची पुनरावृत्ती करण्याची संधी दक्षिण आफ्रिकेला नेदरलॅण्ड्सविरुद्धच्या लढतीद्वारे मिळणार आहे.  
हशिम अमला, जेपी डय़ुमिनी फॉर्मात आल्याने दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी मजबूत झाली आहे. डेल स्टेन आणि इम्रान ताहिर भेदक गोलंदाजी करीत आहेत. एबी डीव्हिलियर्सला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
संघ : दक्षिण आफ्रिका : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), हशिम अमला, क्विंटन डी कॉक, एबी डीव्हिलियर्स, जेपी डय़ुमिनी, ब्युरॉन हेंड्रिक्स, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, अॅल्बी मॉर्केल, मॉर्ने मॉर्केल, वेन पारनेल, आरोन फॅनसिंगो, डेल स्टेन, लोनवाबो त्सोसोबे.
नेदरलॅण्ड्स : पीटर बोरेन (कर्णधार), वेस्ले बारेसी, मुदस्सर बुखारी, बेन कूपर, टॉम कूपर, टॉम हेगलमन, अहसान मलिक, व्हिवियन किंगमा, स्टीफन मायबर्ग, मायकेल रिपॉन, पीटर सीलर, मायकेल स्वार्ट, इरिक स्वायझनस्की, लोगन व्हॅन बीक, टीम व्हॅन डर ग्युगटेन.