News Flash

दक्षिण आफ्रिकेची ‘स्टेन’गन परतली, भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर

क्विंटन डी कॉकलाही संघात स्थान

डेल स्टेनच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघाचा निभाव लागेल?

५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेने आपल्या संघाची घोषणा केली आहे. केप टाऊन येथे पहिली कसोटी खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व फाफ डुप्लेसीसकडे सोपवण्यात आलेलं आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध ऐतिहासीक ४ दिवसीय कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त डुप्लेसीसच्या जागी डिव्हीलियर्सने संघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र भारताविरुद्ध मालिकेसाठी डुप्लेसीस आता पूर्णपणे तयार झाला असल्याचं कळतंय. याव्यतिरीक्त जलदगती गोलंदाज डेल स्टेनचं संघात पुनरागमन आणि स्फोटक फलंदाज क्विंटन डी कॉकला संघात मिळालेली जागा ही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ आफ्रिकेचा कसा सामना करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.

पहिल्या कसोटीसाठी असा असेल दक्षिण आफ्रिकेचा संघ –

फाफ डु प्लेसीस (कर्णधार), हाशिम आमला, टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), थिएनस डी ब्रुन, एबी डिव्हीलियर्स, डीन एल्गर, केशव महाराज, एडीन मार्क्रम, मॉर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरिस, अँडील फेलीक्वेयो, वर्नान फिलँडर, कगिसो रबाडा, डेल स्टेन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 5:05 pm

Web Title: south africa announced team for the first state against india dale styne faf du plesis and de cock gets place in team
टॅग : South Africa
Next Stories
1 Hockey-Badminton 2018 Timetable – बॅडमिंटन आणि हॉकी पुन्हा देशाची मान उंचावणार?
2 …म्हणून एमिरिट्स एअरलाइन्सवर ‘गब्बर’ संतापला!
3 भारत-पाकिस्तान हॉकी सामन्यांसाठी पाकची शिष्टाई, नरेंद्र बात्रांना पाकिस्तान भेटीचं आमंत्रण
Just Now!
X