28 September 2020

News Flash

डी काॅकची दमदार खेळी; आफ्रिकेचा पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय

पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ने जिंकली

यष्टीरक्षक क्विंटन डी काॅकच्या ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच एकदिवसीय सामन्यांची क्रिकेट मालिका ३-२ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २४० धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४० षटकांत ३ बाद २४१ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी काॅकने दमदार खेळी केली. त्याने ५८ चेंडूत ८३ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ३ षटकार खेचले. याशिवाय फाफ डू प्लेसीने नाबाद ५० तर रॅसी वॅन डर डुसेन यानेही नाबाद ५० धावा केल्या. पाकिस्तानच्या इमाम-उल-हा याला मालिकावीरांचा किताब देण्यात आला तर क्विंटन डी काॅकला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 7:30 pm

Web Title: south africa beat pakistan by 7 wickets to win series 3 2
Next Stories
1 ‘खेलो इंडिया’तील सुवर्णपदक विजेते होणार ‘लखपती’
2 IND vs NZ : रोहित, विराटचं दुर्दैवी ‘न्यूझीलंड कनेक्शन’
3 IND vs NZ : भारतावर टीका करणाऱ्या वॉनचे नेटिझन्सकडून ‘दात घशात’
Just Now!
X