आफ्रिका-श्रीलंका कसोटी मालिका

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात दिमाखदार प्रारंभ करणाऱ्या श्रीलंकेला चार जणांना झालेल्या दुखापतींच्या मालिकेने हादरवले.

सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यासाठी आफ्रिकेच्या

वेगवान गोलंदाजांना फार वेळ लागला नाही. श्रीलंकेने २ बाद ६५ धावसंख्येवर मंगळवारी डावाला सुरुवात केली. परंतु ४६.१ षटकांत १८० धावसंख्येवर त्यांचा डाव आटोपला. अष्टपैलू धनंजय डीसिल्व्हा फलंदाजीला उतरू शकला नाही. श्रीलंकेकडून कुशल परेरा (६४) आणि वनिंदू हरंगा (५९) यांनी झुंजार फलंदाजी केली. लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्किए, विआन मुल्डर आणि लुथो सिपाम्ला यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.