दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी पाकिस्तानचा एक डाव आणि १८ धावांनी पराभव केला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश प्राप्त केले.
पहिल्या डावात फक्त १५६ धावा करू शकलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या डावात २३५ धावांपर्यंत मजल मारली. परंतु सामन्यातील आणि मालिकेतील दक्षिण आफ्रिकेच्या विजयात त्यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. डेल स्टेन याने ८० धावांत चार बळी घेतले, तर अझहर अलीला धावचीत केले. त्यामुळे पाकिस्तानची मधली फळी कोसळली. पदार्पणवीर कायले अॅबोटने दुसऱ्या डावात ३९ धावांत २ बळी घेतले. त्याने पहिल्या डावात २९ धावांत ७ बळी घेण्याची किमया साधली होती. त्यामुळे सामनावीर पुरस्कार त्याला देण्यात आला. तथापि, ए. बी. डी’व्हिलियर्स मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 3:41 am