ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात कायम आक्रमक असतो, पण तसे असले तरीही विराटशी पंगा घेऊ नका, असा सल्ला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने ऑस्ट्रेलियाच्या संघाला दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची २१ नोव्हेंबर पासून क्रिकेट मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया कालच ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. भारताचा संघ धोनीशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी२० मालिका खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याशिवाय मैदानात उतरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट हा आक्रमक खेळाडू आहे. तो सध्या चांगल्या लयीत आहे. त्यामुळे त्याच्याशी मैदानावर पंगा घेऊ नका. त्याऐवजी मैदानावर संयम राखा, असा सल्ला त्याने दिला आहे. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडूशी पंगा घ्यायला आवडतो. पण विराट हा लयबद्ध खेळ करणारा खेळाडू आहे. त्यालादेखील आक्रमकपणा आवडतो. त्यामुळे त्याला चिथवू नका, असे दु प्लेसिस म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa skipper faf du plesis says dont confront virat
First published on: 17-11-2018 at 15:28 IST