29 May 2020

News Flash

Ind vs SA : टी-२० मालिकेतही धोनीला संघात जागा मिळण्याची शक्यता कमीच

ऋषभ पंत निवड समितीची पहिली पसंती

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना सुरुवात झाली. भारताच्या विंडीज दौऱ्याआधी धोनी आपली निवृत्ती जाहीर करणार अशी शक्यता निर्माण झालेली असतानात, कर्णधार विराटच्या विनंतीवरुन धोनीने आपला निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलला. यानंतर धोनीने २ महिने क्रिकेटपासून विश्रांती घेत भारतीय लष्करामध्ये सेवाही केली. या विश्रांतीनंतर धोनी पुन्हा एकदा भारतीय संघासाठी सज्ज झाला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यासाठी टी-२० मालिकेतही धोनीला भारतीय संघात जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

अवश्य वाचा – महेंद्रसिंह धोनी संघात हवाच, माजी भारतीय यष्टीरक्षकाने व्यक्त केलं मत

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे. १५ सप्टेंबरपासून आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेसाठीही निवड समिती, विंडीजमध्ये टी-२० मालिकेत विजय संपादन केलेल्या संघाला पुन्हा संधी देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध मालिकेतही ऋषभ पंतच भारतीय संघाचा यष्टीरक्षक म्हणून काम पाहणार आहे.

२०२० साली ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया महिन्यात टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे निवड समिती या महत्वाच्या स्पर्धेत जे खेळाडू खेळू शकतील अशाच खेळाडूंना याआधी संधी देण्याच्या विचारात आहे. विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघ २२ टी-२० सामने खेळणार आहे, त्यामुळे निवड समितीने कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची हे पक्क ठरवलेलं आहे. निवड समितीमधील सुत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली. टी-२० विश्वचषकासाठी निवड समिती ऋषभ पंतला पर्याय म्हणून दोन यष्टीरक्षकांना तयार करण्याच्या विचारात असल्याचंही सुत्रांनी सांगितलं. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध सामन्यासाठी निवड समिती नेमका कोणता संघ जाहीर करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2019 6:11 pm

Web Title: south africa tour to india ms dhoni unlikely to play t20is as selectors in favour of rishabh pant psd 91
Next Stories
1 बेन स्टोक्सच्या खेळीपुढे टेलर स्विफ्टही पडली फिकी
2 महेंद्रसिंह धोनी संघात हवाच, माजी भारतीय यष्टीरक्षकाने व्यक्त केलं मत
3 गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांना बढती? सहाय्यक प्रशिक्षकाचं पद मिळण्याची शक्यता
Just Now!
X