वर्षांच्या उत्तरार्धात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात असून, या दिर्घकालीन दौऱ्यात दोन ट्वेन्टी-२०, सात एकदिवसीय आणि तीन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. या मालिकेला ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेने प्रारंभ होणार आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, भारतीय संघ सर्वप्रथम दक्षिण आफ्रिका अध्यक्षीय संघाविरुद्ध १८ नोव्हेंबरला एक सराव सामनाा खेळणार आहे. त्यानंतर २१ आणि २४ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे दोन ट्वेन्टी-२० सामने उभय संघांमध्ये होणार आहेत. या मालिकेतील तीन कसोटी सामने अनुक्रमे किंग्समेड (दरबान), सहारा पार्क न्यूलँड्स (केप टाऊन) आणि वाँडर्स (जोहान्सबर्ग) या ठिकाणी होणार आहेत. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा कार्यक्रम-
तारीख             सामना                        स्थळ
१८ नोव्हें.    ट्वेन्टी-२० सराव सामना     पोटचेफस्ट्रॉम (दिवस/रात्र)
२१ नोव्हें.    पहिला ट्वेन्टी-२०     जोहान्सबर्ग (दिवस/रात्र)
२४ नोव्हें.    दुसरा ट्वेन्टी-२०     केप टाऊन (दिवस)
२७ नोव्हें.    पहिला एकदिवसीय    दरबान (दिवस/रात्र)
३० नोव्हें.    दुसरा एकदिवसीय        पोर्ट एलिझाबेथ (दिवस/रात्र)
३ डिसें.    तिसरा एकदिवसीय    ईस्ट लंडन (दिवस/रात्र)
६ डिसें.    चौथा एकदिवसीय        सेंच्युरियन (दिवस/रात्र)
८ डिसें.    पाचवा एकदिवसीय    जोहान्सबर्ग (दिवस)
१२ डिसें.    सहावा एकदिवसीय    ब्लोएमफोन्टेन (दिवस/रात्र)
१५ डिसें.    सातवा एकदिवसीय    केप टाऊन (दिवस)
१८ व १९ डिसें.    सराव         पर्ल
२२ व २३ डिसें.    सराव         पीटरमॅरिट्झबर्ग
२६ ते ३० डिसें.     पहिली कसोटी    दरबान
२ ते ६ जाने.        दुसरी कसोटी    केप टाऊन
१५ ते १९ जाने.    तिसरी कसोटी    जोहान्सबर्ग