News Flash

SA vs ENG : क्रिकेट सामन्याला उशीर, कारण ठरला फोटोग्राफर…

SA vs ENG Test : आफ्रिका-इंग्लंड कसोटी सामन्याआधी घडला प्रकार

प्रातिनिधिक छायाचित्र

SA vs ENG : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना गुरूवारी सुरू झाला. सामन्याच्या आधी पाऊस किंवा खराब हवामान असा कोणताही प्रकार घडला नाही. वातावरण अगदी स्वच्छ होतं, पण तरीदेखील एका अतिशय विचित्र कारणामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. एका फोटोग्राफरमुळे कसोटी सामना सुरू होण्यासाठी उशीर झाला.

Video : ‘एकहाती कॅच’… स्मिथला बाद करण्यासाठी निकल्सने टिपला भन्नाट झेल

नक्की काय घडलं?

आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना गुरुवारी सुरू होणार होता. सामना सुरु होण्याआधी एएफपीचा फोटोग्राफर असलेला ख्रिस्टियान कोट्जे याने फोटो काढले. फोटो काढून झाल्यावर तो साईड-स्क्रीनच्या समोरून चालत जात होता. त्यावेळी सीमारेषेवर असलेल्या दोरीवर त्याचा पाय पडला आणि घसरणाऱ्या पिच कव्हरवरून तोल जाऊन तो पडला. अचानक हा प्रकार घडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली. वैद्यकीय पथकाने त्याच्यावर तातडीने प्रथमोपचार केले आणि त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले. या सर्व घटनेमुळे सामना सुरु होण्यास निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाला.

…म्हणून त्याने धवनला मारल्या लाथा, चूक लक्षात येताच मागितली माफी

फोटोग्राफरमुळे दक्षिण आफ्रिकेला फटका?

फोटोग्राफर कोट्जे दुखापतग्रस्त झाल्याने सामना उशिराने सुरू झाला. सामना सुरू होताच दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गार पहिल्याच चेंडूवर बाद झाला. याबाबत कोट्जे म्हणाला की माझ्या दुखापतीमुळे एल्गार बाद झाला नसावा अशी माझी अपेक्षा आहे. कारण तो बाद झाल्यानंतर काही इंग्लंडच्या समर्थकांनी मला धन्यवाद दिल्याचे कानावर आले.

“हिंदू होता म्हणून त्याला पाकिस्तानचे क्रिकेटपटू द्यायचे त्रास”; शोएब अख्तरचा गौप्यस्फोट

डी कॉकने डाव सावरला…

दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्स अँडरसनने पहिल्याच चेंडूवर एल्गारला बाद केले. त्यानंतर आफ्रिकेची अवस्था ५ बाद ११५ झाली होती. पण अनुभवी क्विंटन डी कॉकने ९५ धावांची खेळी केली. त्यामुळे आफ्रिकेला दिवसअखेर २७७ धावांपर्यंत मजल मारता आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 1:41 pm

Web Title: south africa vs england boxing day test injured photographer christiaan kotze delays start of play vjb 91
टॅग : England,Test Cricket
Next Stories
1 Video : ‘एकहाती कॅच’… स्मिथला बाद करण्यासाठी निकल्सने टिपला भन्नाट झेल
2 हिंदू असल्याने त्रास देणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंची नावे जाहीर करणार – दानिश कनेरिया
3 भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका : मुंबईकर दिव्यांशचे दिमाखदार अर्धशतक
Just Now!
X