24 September 2020

News Flash

स्टोक्स, पोपची शतके; इंग्लंडचा धावांचा डोंगर

दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात २ बाद ६० धावा अशी स्थिती झाली आहे.

बेन स्टोक्स

पोर्ट एलिझाबेथ : बेन स्टोक्स (१२०) आणि ऑली पोप (नाबाद १३५) यांच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला डाव ९ बाद ४९९ धावांवर घोषित केला. ४ बाद १४८ या स्थितीतून स्टोक्स आणि पोप यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी २०३ धावांची दणदणीत भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेकडून डावखुरा फिरकीपटू केशव महाराजने पाच बळी घेतले. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात २ बाद ६० धावा अशी स्थिती झाली आहे.

रबाडावर एका सामन्याची बंदी

इंग्लंडचा कर्णधार जो रूटला बाद केल्यानंतर आक्षेपार्हरीत्या जल्लोष केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला कसोटी मालिकेतील चौथ्या लढतीला मुकावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 12:02 am

Web Title: south africa vs england ollie pope and ben stokes post centuries zws 70
Next Stories
1 एफआयएच प्रो-हॉकी लीग : भारताची आज नेदरलँड्सशी झुंज
2 बापू तुमच्या 21 मेडन ओव्हर्सची गोष्ट ऐकून मी मोठा झालोय-सचिन तेंडुलकर
3 भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं निधन
Just Now!
X