इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण इंग्लंडचा संघ आपली कामगिरी सुधारू शकला नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी त्यांना केवळ अडीचशे पार मजल मारता आली.

षटकार मारला की फलंदाज देणार २५० डॉलर्स, कारण…

या सामन्यात एक मजेशीर प्रकार घडला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजी करत होता. तो अतिशय विचित्र प्रकारे बाद झाला. त्याची विकेट पाहून आसपासच्या लोकांनाही हसू आवरले नाही. स्टुअर्ट ब्रॉड आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. तो ओली पोपसह खेळू लागला. तो काही काळ खेळपट्टीवर चांगला खेळ करेल अशी अपेक्षा होती, पण तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही.

हार्दिक-नताशाच्या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्याची वादग्रस्त कमेंट

कॅगिसो रबाडाच्या चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. रबाडाने यॉर्कर चेंडू टाकला. ब्रॉडला तो चेंडू रोखायचा होता, पण शॉट खेळण्यासाठी बॅट मारताना त्याची बॅट पॅडमध्येच अडकली अन् बॅट खाली येण्याआधीच तो क्लीन बोल्ड झाला.

हार्दिकनंतर आता ‘या’ खेळाडूचा नंबर? प्रेयसीसोबतच्या फोटोनंतर चर्चांना उधाण

दरम्यान, इंग्लंडने सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण इंग्लंडची सुरुवात खराब झाली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा केवळ ऑली पोपने धैर्याने सामना केला. पोपने शानदार खेळी केली. पोप व्यक्तिरिक्त बेन स्टोक्सनेही ४७ धावा केल्या. तर जो डेलेने ३८, कर्णधार जो रूटने ३५ आणि डोम सिब्लीने ३४ धावा केल्या.