News Flash

करोनाचा धसका : दक्षिण आफ्रिकेचा दौराही रद्द

खबरदारीचा उपाय म्हणून घेतला निर्णय

करोनाचा धसका : दक्षिण आफ्रिकेचा दौराही रद्द

जगभरात करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे भीतीचं वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि प्रत्येक देश या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोमाने प्रयत्न करत आहे. यापासून वाचण्यासाठी खबरदारीचे उपायही घेतले जात आहेत. मात्र अनेक क्रीडा स्पर्धांना करोनाचा फटका बसला आहे. भारतामध्येही आयपीएलची स्पर्धा पुढे ढकलून १५ एप्रिलपासून सुरु करण्यात येणार आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेचा दौराही रद्द करण्यात आलेला आहे.

दक्षिण आफ्रिकेचे महिला आणि पुरुष संघ सध्या दौऱ्यावर आहेत. पुरुष संघ हा भारतात तर महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होता. मात्र करोनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डातील अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. मात्र पुरुष संघाच्या दौऱ्यावर याचा कोणताही परिणाम होणार नसून हे सामने नियोजीत वेळापत्रकानुसार खेळवण्यात येतील.

आणखी वाचा- Coronavirus : IPL पुढे ढकलली, आता १५ एप्रिल रोजी होणार सुरू

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द झाला. दरम्यान उर्वरित दोन्ही सामने हे प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी या मालिकेतला दुसरा सामना रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 5:28 pm

Web Title: south africa womens tour of australia gets canceled because of carona virus issue psd 91
Next Stories
1 Coronavirus : IPL पुढे ढकलली, आता १५ एप्रिल रोजी होणार सुरू
2 दिल्लीत आयपीएल सामने नाही; करोनामुळे केजरीवाल सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
3 Ranji Trophy Final : सौराष्ट्राची स्वप्नपुर्ती, बंगालवर मात करत पटकावलं विजेतेपद
Just Now!
X