News Flash

थकलेल्या वादळाची कहाणी सुफळ संपूर्ण! डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत एबीडीने आपली निवृत्ती जाहीर केली आहे

एबीडीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डीव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधून निवृत्ती स्विकारली आहे. आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक छोटासा व्हिडीओ शेअर करत डीव्हिलियर्सने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. ज्या मैदानावर डीव्हिलियर्सने पहिल्यांदा क्रिकेट सामना खेळला त्या टच क्रिकेट क्लबच्या मैदानावरुव व्हिडीओ शेअर करत डीव्हिलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. आतापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये मी खेळलो आहे, त्यामुळे यापुढच्या काळात तरुण खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी ज्या प्रकारे क्रिकेट सामने खेळतो आहे, त्यामुळे मला आता थकायला झालं आहे असं म्हणत डीव्हिलियर्सने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 5:08 pm

Web Title: south african cricketer ab de villiers retires from international cricket
Next Stories
1 कसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो …
2 मोजक्या क्रिकेटरसिकांच्या साक्षीने महिला आयपीएलची रंगीत तालीम
3 महिला ट्वेन्टी-२० लीगसाठी ‘बीसीसीआय’ने पुढाकार घ्यावा
Just Now!
X