08 July 2020

News Flash

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धा : भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

सोमवारी अव्वल साखळी पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळवर १७-५ असा एक डाव आणि १२ गुणांनी धमाकेदार विजय मिळवला.

 

काठमांडू (नेपाळ) येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील खो-खो प्रकारात भारताच्या दोन्ही संघांनी श्रीलंका, नेपाळ व बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरीमधील स्थान पक्के केले आहे.

सोमवारी अव्वल साखळी पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळवर १७-५ असा एक डाव आणि १२ गुणांनी धमाकेदार विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या दीपक माधवने संरक्षण करताना तीन मिनिटे, ३० सेकंद पळतीचा खेळ केला व आक्रमणात तीन गडी बाद केले, महिला गटात भारताने नेपाळवर ११-३ असा एक डाव आणि ८ गुणांनी पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 1:08 am

Web Title: south asian kho kho competition akp 94
Next Stories
1 आठ फेरे घेत बबिता फोगट अडकली विवाहबंधनात
2 Video : अ‍ॅस्टन अगारने हवेतच टिपला भन्नाट झेल
3 “आता बस्स झालं…”; हैदराबादच्या घटनेवर विराटची संतप्त प्रतिक्रिया
Just Now!
X