News Flash

क्लबची बाल्कनी कोसळून दोन जलतरणपटूंचा मृत्यू

१६ खेळाडू जखमी झाले असून यांपैकी आठ जलतरणपटू जागतिक अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

दक्षिण कोरिया येथील एका क्लबची बाल्कनी कोसळून शनिवारी दोन जलतरणपटूंचा मृत्यू झाला. त्याशिवाय १६ खेळाडू जखमी झाले असून यांपैकी आठ जलतरणपटू जागतिक अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

‘‘कोयोटे अगली क्लबमध्ये सर्व जलतरणपटू पार्टी करत असताना हा प्रसंग घडला. या क्लबमधील बाल्कनी जमिनीलगतच्या उंचीपासून फक्त १६ फूट उंचीवर बांधण्यात आली असून जखमी झालेल्या खेळाडूंमध्ये १० विदेशी जलतरणपटूंचा समावेश आहे; परंतु ज्या दोन जलतरणपटूंचा मृत्यू झाला आहे, ते जागतिक स्पर्धेत सहभागी नव्हते,’’ असे ग्वांग्जू पोलीस संस्थेचे गुप्तहेर साँग गि-जू यांनी सांगितले. मृत पावलेल्या दोघांचे वय अनुक्रमे ३८ व २७ असे असून त्यांची नावे मात्र अद्याप समजू शकलेली नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 10:45 pm

Web Title: south korea balcony collapse kills 2 injures 16 including us water polo athletes mpg 94
Next Stories
1 आशीष कुमारला सुवर्ण
2 भारत ‘अ’ संघाचा दणदणीत विजय
3 आमिरच्या तडकाफडकी निवृत्तीवर माजी पाक क्रिकेटपटू नाराज, म्हणाले…
Just Now!
X