06 December 2020

News Flash

जर्मनीचा धुव्वा उडवत स्पेन उपांत्य फेरीत

स्पेनच्या विजयात फेरान टोरेस याने हॅट्ट्रिक झळकावत मोलाचा वाटा उचलला

(संग्रहित छायाचित्र)

नेशन्स लीग फुटबॉल

बलाढय़ जर्मनीचा ०-६ असा धुव्वा उडवत स्पेनने नेशन्स लीग फुटबॉलची दिमाखात उपांत्य फेरी गाठली. जर्मनीला मात्र गेल्या ८९ वर्षांत पहिल्यांदाच इतक्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

स्पेनच्या विजयात फेरान टोरेस याने हॅट्ट्रिक झळकावत मोलाचा वाटा उचलला. त्याने ३३व्या, ५५व्या आणि ७१व्या मिनिटाला गोल करत स्पेनला दणदणीत विजय मिळवून दिला. याआधी जर्मनीला १९३१मध्ये ऑस्ट्रियाकडून मैत्रीपूर्ण सामन्यात ०-६ असा पराभव पत्करावा लागला होता. अन्य सामन्यांत, फ्रान्सने स्वीडनवर ४-२ अशी सरशी साधली. ऑलिव्हियर गिरौडचे दोन गोल फ्रान्सच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले. मध्यरक्षक रुबेन डायस याने केलेल्या दोन गोलच्या बळावर पोर्तुगालने क्रोएशियावर ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

इक्वेडोरची कोलंबियावर मात

विश्वचषक पात्रता फेरी फुटबॉल

फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीतील दक्षिण अमेरिकन गटात इक्वेडोरने कोलंबियाला ६-१ असे नमवत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. इक्वेडोरचे चार सामन्यांत नऊ गुण झाले असून त्यांना आता ब्राझील वि. उरुग्वे आणि अर्जेटिना वि. पेरू यांच्यातील सामन्यांच्या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. ब्राझीलचे नऊ तर अर्जेटिनाचे सात गुण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:14 am

Web Title: spain beat germany in the semifinals abn 97
Next Stories
1 २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला क्रिकेटचा समावेश, ICC ने दिली माहिती
2 विराटच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता, त्याने कर्णधारपद रोहितकडे सोपवण्याचा विचार करावा !
3 संगाकाराच्या विकेटने कारकिर्दीला सुरूवात करणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त
Just Now!
X