सेव्हिया/सेंट पीटर्सबर्ग

पहिल्या दोन लढती बरोबरीत सोडवल्यानंतर २०१०च्या विश्वचषक विजेत्या स्पेनचा झंझावात बुधवारी पाहायला मिळाला. स्पेनने युरो चषक स्पर्धेत स्लोव्हाकियाचा ५-० असा धुव्वा उडवत बाद फेरीतील स्थान निश्चित केले.

मार्टिन दुब्रावका याच्या स्वयंगोलमुळे स्पेनला ३०व्या मिनिटाला आघाडी मिळाली. त्यानंतर अयमेरिक लॅपोर्टे (४५+३ मिनिटाला), पाबलो साराबिया (५६व्या मिनिटाला), फेरान टोरेस (६७व्या मिनिटाला), जुराज कुका (स्वयंगोल, ७१व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे स्पेनने दणदणीत विजयाची नोंद केली.

स्वीडनचा पोलंडवर विजय

विक्टर क्लेसन याने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे स्वीडनने पोलंडवर ३-२ असा थरारक विजय मिळवत ‘ई’ गटात अग्रस्थान पटकावले. इमिल फोर्सबर्ग याने स्वीडनसाठी पहिले दोन गोल केले. पण नंतर अव्वल फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोव्हस्की याने ६१व्या आणि ८४व्या मिनिटाला गोल साकारत सामन्यात रंगत निर्माण केली होती.

गुणतालिका गट ‘ई’

संघ                 सा     वि     प      ब      गु

स्वीडन            ३        २      ०      १      ७

स्पेन               ३        १      ०      २      ५

स्लोव्हाकिया    ३      १      २      ०      ३

पोलंड              ३      ०      २      १      १