फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार युरोपियन विजेता स्पेन अव्वल दहा संघांमधून बाहेर फेकला गेला आह़े  विश्वचषक विजेता जर्मनी (१७७० गुण)अव्वल स्थानावर कायम आह़े
अर्जेटिना (१५७७), कोलंबिया (१४९९), बेल्जियम (१४७१) आणि नेदरलॅंड (१४१५) हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत़  
या क्रमवारीत अव्वल दहांमध्ये स्पेनसह दोन फेरफार पाहायला मिळाल़े  ब्राझील १३४८ गुणांसह सहाव्या स्थानावर कायम असून त्यापाठोपाठ पोर्तुगाल (११९१), फ्रान्स (११८०), उरुग्वे (११६४) यांचा क्रमांक आहे  इटलीने दोन स्थानांची झेप घेत दहावे स्थान पटकावले, तर एक स्थानाच्या घसरणीमुळे स्पेन ११व्या क्रमांकावर आला आह़े  या क्रमवारीत कोस्टा रिकाने १३वे स्थान कायम राखले आह़े