27 September 2020

News Flash

स्टार टेनिसपटू राफेल नदाल Engaged

१४ वर्षांपासून रिलेशनमध्ये असलेल्या गर्लफ्रेंडशी करणार विवाह

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल त्याची गर्लफ्रेंड मेरी परेनो हिच्याबरोबर विवाह करणार आहे. त्यांचा साखपुडा झाला असल्याचे त्याने जाहीर केले आणि याच वर्षात तो विवाहबद्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मेरी आणि राफेल गेली १४ वर्षे रिलेशनमध्ये आहेत. नदालने मेरीला गेल्या वर्षी रोम प्रवासात प्रपोज केले होते. त्याची घोषणा त्याने आत्ता केली.

राफेलने या पूर्वीही विवाहाचे संकेत दिले होते, मात्र तो त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारसा बोलत नव्हता. सोशल मिडीयावर त्याबद्दल फारशी माहितीही त्याने दिली नव्हती. मे महिन्यात नदालने मेरीला प्रपोज केले. त्यानंतर २०१९ या वर्षाची सुरुवात नदालसाठी खास झाली नाही. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे चाहते काहीसे नाराज होते. पण त्यानंतर त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2019 5:50 pm

Web Title: spain tennis player rafael nadal announces his engagement
Next Stories
1 भारतात रंगणार नवी क्रिकेट लीग
2 मराठमोळी स्मृती मंधाना ‘मालिकावीर’; भारतीय महिलांचा मालिका विजय
3 भारताची मिताली ‘जगात भारी’; केले अनोखे द्विशतक
Just Now!
X