News Flash

तुमच्यापुढे मी कोणीही नाही, माझी सगळी पदकं तुमची ! कॅरोलिना मरिनकडून डॉक्टरांचा सन्मान

करोनाशी सामना करणाऱ्या डॉक्टरांचं केलं कौतुक

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण आहे. अनेक प्रगत देशही या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. प्रादूर्भाव वाढू नये यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या काळात बंद करण्यात आल्या होत्या. विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर हे रात्रंदिवस मेहनत करत आहेत. २०१६ रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती स्पेनची बॅटमिंटनपटू कॅरोलिना मरिनने आपल्या देशातील सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी कॅरोलिनाने माद्रिद येथील Virgen del Mar या हॉस्पिटलला भेट दिली. “तुमच्यापुढे मी कोणीही नाही, माझी सगळी पदकं तुम्हाला द्यायला तयार आहे”, या शब्दांत कॅरोलिनाने सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे.

“मी गेले काही दिवस स्पेनमधील हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांशी बोलतेय. ते खऱ्या अर्थाने माझ्या देशाचे हिरो आहेत. मी माझी सर्व पदकं त्यांना देण्याची तयारीही दाखवली. सध्याच्या खडतर काळात ते ज्या पद्धतीने रुग्णांची सेवा आणि काळजी घेत आहेत यासाठी त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास खरंच वाखणण्याजोगा आहे. प्रत्येक जण आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची काळजी घेतोय, यासाठी मला त्यांचे आभार मानायचे होते.” इंडियन एक्स्प्रेसने पाठवलेल्या इ-मेलला कॅरोलिना मरिनने आपलं उत्तर दिलं.

आपल्याला बॅडमिंटन कोर्टवरुन परतून पुन्हा खेळण्याची इच्छा असली तरीही या महामारीमुळे जगभरात झालेलं नुकसान हे हादरवून सोडणारं आहे. जास्तीत जास्त वेळ घरात राहणं हाच एक पर्याय आपल्यासमोर असल्याचं मरिनने सांगितलं. रिओ ऑलिम्पिकमध्ये मरीनने सायनावर मात करत सुवर्णपदक पटकावलं होतं. याआधी २०१५ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक आणि २०१६ साली युरोपियन चॅम्पिअनशीप स्पर्धेत मरिनने सुवर्णपदकाची कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 1:53 pm

Web Title: spanish star carolina marin ready to give her gold medals to medical professionals psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भारताची खोडी काढणाऱ्या आफ्रिदीला माजी खेळाडूचं सडेतोड उत्तर
2 सचिन ओपनिंगला स्ट्राइक घेणं का टाळायचा? गांगुलीनं सांगितलं कारण
3 वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज म्हणतो, “सचिनला गोलंदाजी करणं म्हणजे…”
Just Now!
X