छत्तीसगडच्या स्पर्श खंडेलवालने तिसऱ्या फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुखशी अनपेक्षितरीत्या बरोबरी साधत नाशिकमध्ये आयोजित केलेल्या अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला. तिसऱ्या फेरीअखेर २०पेक्षा अधिक खेळाडूंनी तीनही डाव जिंकून आघाडी घेतली आहे. त्यात नाशिकच्या वेदांत पिंपळखरे, अवधूत लोंढे, जयदेव झवेरी यांचा समावेश आहे.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने येथील रेषा मल्टिअॅक्टिव्हिटी सेंटरच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी स्पर्श खंडेलवाल विरुद्ध अनुप देशमुख यांच्यातील डाव इतर खेळाडूंसाठी एक पर्वणीच ठरला. दोन्ही खेळाडूंच्या एलो गुणांमध्ये ५५० गुणांचे अंतर असूनही स्पर्शने उत्कृष्ट खेळ केला.
स्पर्धेच्या इतर प्रमुख लढतींचे निकाल पुढीलप्रमाणे- आंतरराष्ट्रीय मास्टर रवी तेजा विजयी विरुद्ध महेश पाटील, आंतरराष्ट्रीय मास्टर आर. जी. कृष्णा वि. वि. सिमंतिनी हुच्चे, हेमंत शर्मा वि. वि. यशवर्धन राठी, श्राहुल संगर्मा वि. वि. रूपेश भोगल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 27, 2015 4:17 am