दीपक जोशी

इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात विश्वचषकामधील दुसरी लढत मंगळवारी होणार आहे. २०१५च्या विश्वचषकात सिडनी येथे झालेल्या उभय संघांमधील एकमेव लढतीत डकवर्थ-लुइस नियमाआधारे इंग्लंडपुढे २५ षटकांत १०१ धावांचे माफक आव्हान दिले गेले, जे इंग्लंडने एका गडय़ाच्या मोबदल्यात १९व्या षटकातच पूर्ण केले. सध्याच्या विश्वचषकात दोन्ही संघांची ही पाचवी लढत आहे. इंग्लंडने चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे, तर चारही सामने गमावल्यामुळे तळात असलेला अफगाणिस्तानचा संघ काही चमत्कार करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.