26 September 2020

News Flash

क्रीडा क्षेत्रासाठी केवळ १२ कोटी रुपये वाढीव

नव्या आर्थिक वर्षांचा हंगामी अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी संरक्षण, गृहसह शिक्षण, आरोग्य खात्यांना हात खुला केला

| February 18, 2014 03:52 am

नव्या आर्थिक वर्षांचा हंगामी अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी संरक्षण, गृहसह शिक्षण, आरोग्य खात्यांना हात खुला केला असतानाच देशाच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांसाठी मात्र वाढीव केवळ १२ कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे. २०१४-१५ च्या अंतरिम अर्थसंकल्पात या खात्यासाठी १,०९३ कोटी रुपये असा स्थिर योजनाबद्ध खर्च अंदाजित केला असून योजनाबाह्य खर्च मात्र १२६ कोटी रुपये प्रस्तावित केला आहे.
चिदम्बरम यांनी क्रीडा व युवक कल्याण खात्याचा विचार करताना योजनाबद्ध तरतुदीचा आकडा कायम राखला आहे; मात्र योजनाबाह्य आर्थिक तरतुदीत वाढ केली आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१३-१४च्या अर्थसंकल्पात सुरुवातीला नमूद केलेली तरतूद नंतर वाढवून १,२०७.७९ कोटी (योजनाबद्ध – १,०९३ कोटी रुपये आणि योजनाबाह्य – ११४.७६ कोटी रुपये) करण्यात आली होती.
भारतीय क्रीडा प्राधिकरणासाठी (साइ) सर्वाधिक ३२५.१० कोटी रुपयांची (सुमारे ५ कोटी रुपयांची वाढ) तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या कारभारासाठी १६५ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. गतवर्षी १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. गुणवत्ता शोध आणि प्रशिक्षक योजनेसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उत्तेजक पदार्थाविरुद्धच्या मोहिमेसाठी ११.६० कोटी राखून ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी यासाठी ८.३० कोटी तरतूद करण्यात आली होती. यापैकी राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला ९ कोटी रुपये दिले जातील. गेल्या वर्षी ५.७० कोटी दिले गेले आहे. पंचायत युवा क्रीडा आणि खेळ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी गेल्या वर्षीच्या १८० कोटी रुपयांच्या तरतुदीच्या तुलनेत या वर्षी फक्त २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शहरी क्रीडाविषयक योजनांसाठी ३५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत १० कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास निधी गेल्या वर्षीप्रमाणेच पाच कोटी रुपये देण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 3:52 am

Web Title: sports ministry gets rs 12 crore hike in annual budget
Next Stories
1 शाब्बास ब्रेन्-डन
2 युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : कुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत विजयी
3 परतफेड! अर्सेनेलची लिव्हरपूलवर मात
Just Now!
X