भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) केरळमधील अल्लापुझा केंद्रात झालेल्या दुर्घटनेनंतर भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी क्रीडा मंत्रालयाने साइ केंद्रांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. खेळाडूंसाठी २४ तास हेल्पलाइन क्रमांक, १५ दिवसांतून एकदा मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मुलींच्या वसतिगृहांसाठी पूर्णवेळ महिला अधीक्षक आणि केंद्राची जबाबदारी सहाय्यक संचालकपदाच्या व्यक्तीकडे असावी, ही तत्वे निश्चित करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक साइ केंद्रात योग उपक्रम सक्तीचे असावे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. सर्व खेळाडूंना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना पुरवण्यात यावी अशा सूचना मंत्रालयाने केली आहे.