भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि १९८३ साली वेस्ट इंडिजसारख्या तगड्या संघाला पराभवाचा धक्का देऊन पहिल्यांदा विश्वचषक जिंकणाऱ्या कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता कपिल देव यांच्या छातीत दुखायला लागलं. तपासणीसाठी साऊथ दिल्ली भागातील ओखला परिसरात असलेल्या फोर्टीस रुग्णालयात कपिल देव आले होते. यावेळी डॉक्टरांनी कपिल देव यांची तपासणी करुन त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली आहे.

६१ वर्षीय कपिल देव यांची तब्येत आता स्थिर असून क्रीडा क्षेत्रासह अनेक मान्यवर व्यक्ती त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

१६ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत कपिल देव यांनी खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावल. १९८३ विश्वचषकासह अनेक महत्वाच्या स्पर्धा भारताला जिंकवून देण्यात कपिल देव यांचा मोठा वाटा होता.