भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आसाम सरकारने यंदाच्या वर्षासाठी हिमा दासचं नाव पाठवलं आहे. आसाम क्रीडा विभागाचे सचिव दुलाल चंद्र दास यांनी हिमाच्या नावाची शिफारस करणारं पत्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पाठवलं आहे. २०१८ पासून हिमा दास आंतरराष्ट्रीय स्तरावर धडाकेबाज कामगिरी करत आहे. यंदाच्या वर्षातली खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केलेली हिमा दास ही सर्वात तरुण उमेदवार ठरली आहे.

यंदाच्या वर्षासाठी हिमा दोससोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची नावंही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहेत. २०१८ आणि २०१९ ही वर्ष हिमा दाससाठी चांगली केली आहेत. आशियाई खेळांपासून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हिमाने पदकांची लयलूट केली आहे. याआधी २०१८ साली हिमाला अर्जुन पुरस्काराने गौरवण्या