News Flash

IPL 2021 : सनरायजर्सच्या पराभवानंतर ‘या’ तरुणीचे फोटो व्हायरल! कोण आहे ही तरुणी?

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं सनरायजर्स हैदराबादला ६ धावांनी पराभूत केलं आहे.

फोटो सौजन्य - ट्वीटर

बुधवारी आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराटसेना Royal Challengers Bangalore ने आपला दुसरा विजय नोंदवला. त्यामुळे बंगळुरूचे चाहते प्रचंड खूश होते. मात्र, दुसरीकडे पराभूत होणाऱ्या सनरायजर्स हैदराबादसाठी मात्र हा निराशाजनक पराभव ठरला. त्यामुळे हैदराबादचे असंख्य चाहते नाराज असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या पराभवानंतर एका तरुणीचे निराश झालेले फोटो प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. सनरायजर्सचे फलंदाज जसजसे तंबूत परतत होते, तसतशी या तरुणीच्या चेहऱ्यावरची निराशा वाढत होती. पण ही तरुणी नेमकी कोण आहे? या सामन्यात असं काय घडलं ज्यामुळे ही तरुणी इतकी निराश झाली?

 

कोण आहे व्हायरल फोटोंमधली तरुणी?

फोटो व्हायरल झालेल्या तरुणीचं नाव आहे काव्या मारन. सनरायजर्स हैदराबाद ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. शिवाय, ती Sunrisers Hyderabad ची CEO देखील आहे. जेव्हा हेदराबादच्या डेक्कन चार्जर्स संघाला आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली, तेव्हा सनरायजर्स हैदराबादची स्थापना करण्यात आली. कलानिधी मारन यांच्या सन ग्रुपकडे सनरायजर्स हैदराबादची मालकी आहे. त्यांचीच मुलगी आणि संघाची सीईओ Kavya Maran ही काल आपल्या संघाचा सामना बघण्यासाठी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर उपस्थित होती. पण संघाची कामगिरी पाहून काव्या मारनचा हिरमोड झाला आणि तिचे हेच हावभाव दाखवणारे फोटो कालपासूनच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

 

हैदराबादच्या फलंदाजांची हाराकिरी

कालच्या सामन्यामध्ये RCB च्या धुरंधरांना अवघ्या १४९ धावांवर रोखण्यात SRH च्या गोलंदाजांना यश आलं. त्यामुळे आता सामना जिंकण्याची जबाबदारी फलंदाजांवर होती. पण डेविड वॉर्नर (५४) वगळता सनरायजर्सच्या इतर फलंदाजांनी विराट कोहलीच्या गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली. मनीष पांडेने (३८) वॉर्नरला साथ देण्याचा प्रयत्न केला खरा. पण तो देखील अपुराच ठरला. शेवटी अवघ्या ६ धावांनी हैदराबादला पराभव पत्करावा लागला.

 

RCB vs SRH : बंगळुरूने हैदराबादकडून हिसकावला विजयाचा घास!

१७ वं षटक धोक्याचं!

हैदराबादच्या डावात १७वं षटक बंगळुरूच्या शाहबाज अहमदनं टाकलं. त्या एका षटकामध्ये त्यानं संपूर्ण सामनाच बंगळुरूच्या बाजूने झुकवला. एकाच षटकात शाहबादनं हैदराबादच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळे हैदराबादच्या हातात असलेला सामना निसटला. यानंतर लगेचच स्क्रीनवर काव्या मारन दिसू लागली.

 

Video: चिडलेल्या कोहलीने बॅटने उडवली खुर्ची, IPL च्या आचारसंहितेचा भंग; मॅच रेफ्रींनी फटकारलं

आपल्या संघाच्या कामगिरीमुळे झालेली निराशा तिच्या चेहऱ्यावर अगदी सहज दिसत होती. तिचे फोटो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होऊ लागले. हैदराबादच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर हे फोटो व्हायरल करत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. काही नेटिझन्सनी तिच्या फोटोंवर मीम्स देखील बनवले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 5:08 pm

Web Title: srh team owner daughter kavya maran viral pic in srh vs rcb ipl 2021 match pmw 88
टॅग : Cricket News,IPL 2021
Next Stories
1 …अखेर दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वी शॉचा हट्ट पुरवला
2 IPL 2021: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स; यष्टीरक्षक कर्णधार आमनेसामने
3 Video: चिडलेल्या कोहलीने बॅटने उडवली खुर्ची, IPL च्या आचारसंहितेचा भंग; मॅच रेफ्रींनी फटकारलं
Just Now!
X