News Flash

IPL 2017 Qualifier : जेतेपदासाठी अखेरची संधी

कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा या मोसमात भन्नाट फॉर्मात असून त्याच्या नावावर सहाशेपेक्षा जास्त धावा आहेत.

| May 17, 2017 10:53 am

कोलकाता नाइट रायडर्स संघ

कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात आज चुरशीची लढत

आतापर्यंत पराजयापेक्षा जास्त विजय मिळवत कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हेदराबाद हे ‘एलिमिनेटर’मध्ये दाखल झाले असून हा सामना जिंकल्यास त्यांना जेतेपदाच्या दिशेने कूच करता येईल. पण हा सामना जो गमावेल त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.

कोलकाताने स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती. पण गेल्या सात सामन्यांमध्ये त्याला चार सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या संघ सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात दिसत नाही. पण त्यांच्या संघात ख्रिस लिनचे पुनरागमन होत असून त्याच्यामध्ये एकहाती सामना फिरवण्याची धमक आहे. सुनील नरिन हा चांगला फिरकीपटू असला तरी या मोसमात तो धडाकेबाज सलामीवीर म्हणून सर्वासमोर आला आहे. या मोसमात सर्वात जलद १५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्यामुळे हैदराबादला यावेळी नरिनसाठी विशेष रणनिती आखावी लागणार आहे. कर्णधार गौतम गंभीर हा सातत्याने धावा करत असला तरी त्याला संघाला सामना जिंकवून देता आलेला नाही. त्याच्या नावावर आतापर्यंत ४५४ धावा जमा आहेत. त्याची सामना जिंकवून देणाऱ्या खेळीच्या प्रतिक्षेत कोलकाताचे चाहते असतील. लिन आणि गंभीर यांनी गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यात १८४ धावांची भागीदारी रचली होती. त्यामुळे या दोघांकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. मनीष पांडे आणि रॉबिन उथप्पा यांच्याकडूनही चांगली फलंदाजी पाहायला मिळाली असून त्यांच्या नावावर अनुक्रमे ३९६ आणि ३८६ अशा धावा आहेत. कोलकाताकडे नरिनबरोबर उमेश यादवसारखा सातत्याने तिखट मारा करणारा गोलंदाज आहे.

हैदराबादने १४ साखळी सामन्यांमध्ये आठ सामने जिंकले असून पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर एका सामन्याच्या निकाल लागू न शकल्याने १७ गुणांनिशी त्यांनी अव्वल चार संघांमध्ये स्थान पटकावले होते. कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा या मोसमात भन्नाट फॉर्मात असून त्याच्या नावावर सहाशेपेक्षा जास्त धावा आहेत. जर कोलकात्यासमोर वॉर्नर झटपट बाद झाला तर त्यांच्या समस्यांमध्ये भर पडेल. हैदराबादकडे युवराज सिंगसारखा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारसारखा अव्वल गोलंदाज त्यांच्याकडे आहे. आतापर्यंत त्याने १३ सामन्यांमध्ये २५ बळी मिळवले आहेत. गोलंदाजांच्या यादीत सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत तो अव्वल स्थानावर विराजमान आहे. भुवनेश्वरबरोबर रशिद खान हा सातत्याने भेदक मारा करत आहे.

नेहरा उर्वरीत सामन्यांना मुकणार

सनरायझर्स हैदराबादचा मध्यमगती गोलंदाज आशीष नेहरा दुखापतीमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांत खेळू शकणार नाही, अशी माहिती संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी दिली. ‘आशीष नेहरा हा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तो संघाच्या सेवेत यापुढील सामन्यांसाठी नसेल. ६ मे रोजी झालेल्या सामन्यात नेहराचे स्नायू दुखावले होते. त्याची ही दुखापत गंभीर स्वरूपाची आहे. आमचा कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध बुधवारी निर्णायक सामना असून त्यामध्ये त्याची अनुपस्थिती आम्हाला नक्कीच जाणवेल,’ असे मूडी यांनी सांगितले.

आजचा सामना : कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद.

संभाव्य संघ

कोलकाता नाइट रायडर्स : गौत गंभीर (कर्णधार), पीयुष चावला, ऋषी धवन, सयान घोष, शेल्डॉन जॅक्सन, इशांक जग्गी, कुलदीप यादव, मनीष पांडे, युसुफ पठाण, सूर्यकुमार यादव, अंकित राजपूत, संजय यादव, रॉबिन उथप्पा, उमेश यादव, ख्रिस वोक्स, शकीब अल हसन, रोव्हमन पॉवेल, ख्रिस लिन, सुनील नरिन, नॅथन कोल्टिअर नील, ट्रेंट बोल्ट.

सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), तन्मय अगरवाल, रिकी भुई, बिपुल शर्मा, शिखर धवन, एकलव्य द्विवेदी, दीपक हुडा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अभिमन्यू मिथुन, मोहम्मद सिराज, नमन ओझा, विजय शंकर, बरिंदर स्ररण, प्रवीण तांबे, युवराज सिंग, केन विल्यमसन, रशीद खान, मुस्ताफिझूर रहमान, मोहम्मद नबी, बेन लॉलिन, ख्रिस जॉर्डन, मॉइझेस हेन्रिके, बेन कटिंग.

वेळ : रात्री ८.०० वा. पासून

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी मॅक्स वाहिन्यांवर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:00 am

Web Title: srh vs kkr preview ipl 2017 qualifier kolkata knight riders sunrisers hyderabad ipl 2017
Next Stories
1 ललिता बाबर विवाहबद्ध
2 IPL2017 : पुणेरी पाऊल पडते पुढे, मुंबईला पराभूत करुन ‘फायनल’मध्ये प्रवेश
3 अनुप कुमार यु मुंबाकडे कायम
Just Now!
X