कोलंबो : दक्षिण आफ्रिकेच्या मिकी आर्थर यांची पुढील दोन वर्षांकरिता श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकपदावर निवड करण्यात आली आहे. सध्याचे प्रशिक्षक चंद्रिका हथुरूसिंघा यांच्याकडून ते प्रशिक्षकपदाची सूत्रे घेतील. याचप्रमाणे मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी ग्रँट फ्लॉवर फलंदाजी प्रशिक्षक असतील, तर डेव्हिड सेकर गोलंदाजीचे प्रशिक्षक असतील. श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच शेन मॅकडरमॉट यांनी सांभाळली आहे. महिन्याअखेरीस श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून, यावेळी आर्थर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येईल