14 December 2017

News Flash

VIDEO: रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्न फलंदाजाला पडला महागात

चेंडू लागल्यानंतर श्रीलंकेचा फलंदाज गुणारत्ने जागीच कोसळला.

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: February 21, 2017 4:02 PM

ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप मारण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेच्या फलंदाजाला चेंडू लागला.

ट्वेन्टी-२० सामन्यात कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा वसुल करण्यासाठी फलंदाज आगळेवेगळे फटके मारण्याचा प्रयत्न करत असतात. क्रिकेटच्या या झटपट धावा मिळविण्याच्या प्रकारामुळे क्रिकेट विश्वात नवनव्या फटक्यांचा शोध लागला. मोठा फटका मारण्यासाठी फलंदाज ट्वेन्टी-२० सामन्यात कोणतीही जोखमी पत्करण्यासाठी तयार असतात. पण हे बेफाम फटके मारण्याचे धाडस कधीकधी कसा अंगलगट येऊ शकतो याचं उदाहरण नुकतेच श्रीलंकात विरुद्ध ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० सामन्यात पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप मारण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेच्या फलंदाजाला चेंडू लागला. चेंडू लागल्यानंतर श्रीलंकेचा फलंदाज गुणारत्ने जागीच कोसळला. गुणारत्ने चेंडू लागल्यानंतर खूप कळवळला. पुन्हा उठून उभा राहण्याचा त्याने प्रयत्न देखील केला, पण तो दुखापतीमुळे पुन्हा खाली कोसळला. सामन्याच्या १६ व्या षटकात हा प्रकार घडला. फॉकनरच्या पहिल्याच चेंडूवर गुणारत्नेने डीप थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मिळविण्यासाठी रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. फॉकनरचा चेंडू गुणारत्नेला लागला आणि तो कळवळला. दुखापतीनंतरही गुणारत्नेने हार न मानता ३७ चेंडूंमध्ये ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारून संघाला विजयश्री प्राप्त करून दिला. गुणरत्नेला झालेली दुखापत गंभीर असल्याचे पाहून काही वेळाने सर्वांनी त्याच्याजवळ धाव घेतली होती. काही वेळाने गुणारत्नेने स्वत:ला सावरून पुन्हा फलंदाजीला सुरूवात केली.

First Published on February 17, 2017 8:52 pm

Web Title: sri lanka batsman asela gunaratne hit on groin by james faulkner