News Flash

श्रीलंकेचा अडखळत विजय

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १२९ धावांची मजल मारली.

दिनेश चंडिमलचे अर्धशतक आणि गोलंदाजांच्या भेदक कामगिरीच्या बळावर श्रीलंकेने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध १५ धावांनी विजय मिळवला.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १२९ धावांची मजल मारली. चंडिमलने ७ चौकार व एका षटकारासह ५० धावा केल्या. दिलशानने २७ धावा केल्या. अमिरातीतर्फे अमजद जावेदने ३ बळी घेतले. मग अमिरातीची ४ बाद १६ अशी अवस्था झाली. या धक्क्यातून ते सावरलेच नाही. निर्धारित षटकात त्यांनी ११५ धावा केल्या.स्वप्निल पाटीलने सर्वाधिक ३७ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे लसिथ मलिंगाने ४ तर नुवान कुलसेकराने ३ बळी घेतले. अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या चंडिमलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 12:26 am

Web Title: sri lanka beat uae by 14 runs
Next Stories
1 सामना निश्चितीप्रकरणी त्सोत्सोबेची चौकशी
2 ब्लाटर, प्लॅटिनी यांच्या शिक्षेत घट
3 भारताच्या विजयाची पाच कारणे…
Just Now!
X