News Flash

‘यॉर्करकिंग’ लसिथ मलिंगा टी-२० वर्ल्डकप खेळणार?

वनडे, कसोटी आणि IPL क्रिकेटला मलिंगाने ठोकलाय रामराम

लसिथ मलिंगा

श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. आतापर्यंत त्याने कसोटी, एकदिवसीय आणि आयपीएल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र मलिंगाने अद्याप आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीला निरोप दिलेला नाही. गेल्या वर्षी करोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी या दिग्गज गोलंदाजाने आपल्या देशासाठी अखेरचा टी-२० विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मला देशासाठी ही शेवटची स्पर्धा खेळायची आहे, असे मलिंगाने सांगितले होते.

करोनामुळे ऑस्ट्रेलियामधील टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे ३७ वर्षीय मलिंगाची टी-२० कारकीर्द अनिश्चिततेत सापडली आहे. क्रिकेट बोर्डाने आपल्या एकदिवसीय संघातून वरिष्ठ खेळाडूंना डच्चू दिल्यामुळे मलिंगा विश्वचषक स्पर्धेत खेळणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

एका स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता प्रमोद विक्रमसिंघे म्हणाले, ”लसिथ मलिंगा हा आमच्या टी-२० विश्वचषक योजनेचा एक भाग आहे. तो देशातील महान गोलंदाजांपैकी एक आहे, हे आपण विसरू शकत नाही. सलग २ टी-२० विश्वचषक खेळायचे आहेत आणि त्यांचा फॉर्मही चांगला आहे. येत्या काही दिवसांत आम्ही मलिंगाला भेटू, तेव्हा आम्ही त्यांच्याशी या संदर्भात बोलू.”

लसिथ मलिंगाने काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले होते, ”मी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु टी-२० स्वरूपात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी निवड समिती माझ्याबद्दल कोणता निर्णय घेते, हे मला जाणून घ्यायचे आहे. मी कमबॅक करून चांगली कामगिरी करतो आणि असे मी माझ्या कारकीर्दीत बर्‍याच वेळा केले आहे.”

२०१४च्या टी-२० विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाचा सदस्य असलेल्या लसिथ मलिंगाने आतापर्यंत ८५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०७ बळी घेतले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 5:19 pm

Web Title: sri lanka cricket board reveals lasith malinga to play in upcoming t20 world cup adn 96
Next Stories
1 रोम ऑलिम्पिकमध्ये खेळलेले भारताचे माजी फुटबॉलपटू फॉर्चुनाटो फ्रॅन्को कालवश
2 छत्रसालमध्ये युवा कुस्तीपटूचा खून, ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमार फरार!
3 इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने घेतली करोनाची लस