News Flash

२०११च्या वर्ल्डकपमध्ये ९७ धावांवर गंभीरची दांडी गुल करणारा क्रिकेटपटू निवृत्त!

काही दिवसांपूर्वी या क्रिकेटपटूने ठोकलेत ६ चेंडूत ६ षटकार

२०११ वर्ल्डकप फायनल

श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. श्रीलंका क्रिकेट (एसएलसी)च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय थिसारा परेराने निवृत्तीची माहिती बोर्डाला दिली आहे. श्रीलंका क्रिकेटचे निवडकर्ता थिसारा परेरासह अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंना एकदिवसीय संघातून वगळणार असल्याचे वृत्त होते. या चर्चेनंतर परेराने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. परेरा फ्रेंचायझी क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे.

 

श्रीलंकेच्या क्रिकेट निवड समितीने अलीकडेच घोषणा केली होती, की वनडे संघातून अनेक ज्येष्ठ खेळाडू वगळण्याचा त्यांचा विचार आहे. संघाला पुढे बांगलादेश आणि इंग्लंडचा दौरा करावा लागणार आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले, की निवडकर्त्यांना दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, सुरंगा लकमल आणि थिसारा परेरा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना आगामी मालिकेसाठी मर्यादित षटकांच्या संघात निवडण्याची इच्छा नाही. श्रीलंकेला बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय आणि इंग्लंडविरूद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे.

६ चेंडूत ६ षटकार

थिसारा परेराने काही दिवसांपूर्वी, एका स्थानिक सामन्यात ६ चेंडूत ६ षटकार ठोकले होते. परेराने आर्मी स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना ब्लूमफिल्ड विरूद्ध ऐतिहासिक खेळी खेळली होती. एका षटकात सहा षटकार मारणारा परेरा हा श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला. तसे, तो जगातील ९वा आणि ५० षटकांच्या सामन्यात सलग ६ षटकार ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला.

२०११च्या वर्ल्डकप फायनलमध्ये कामगिरी

भारताने जिंकलेल्या २०११च्या वर्ल्डकप फायनलमध्ये परेराने फलंदाजी करताना १० चेंडूत २२ धावा चोपल्या होत्या. याच सामन्यात त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला ९७ धावांवर बाद केले होते.

कारकीर्द

२००९ मध्ये पदार्पण केल्यानंतर परेराने श्रीलंका संघाकडून ६ कसोटी, १६६ एकदिवसीय आणि ८४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परेराने ६ कसोटी सामन्यांमध्ये २०३ धावा केल्या आणि ११ बळी घेतले. त्याचबरोबर १६६ एकदिवसीय सामन्यात त्याने २३३८ धावा आणि १७५ बळी घेतले. ८४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात परेराने १२०4 धावा आणि ५१ बळी घेतले. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत परेराने एक एकदिवसीय शतक झळकावले आहे. २०१९मध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध माउंट माऊंनहाई येथे १४० धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 3:41 pm

Web Title: sri lanka cricketer thisara perera announces retirement from international cricket adn 96
Next Stories
1 IPLवर करोनाचं सावट गडद; चेन्नईच्या टीममध्येही केला शिरकाव
2 IPL 2021: कोलकाताच्या खेळाडूंना करोनाची बाधा; आजचा सामना पुढे ढकलला
3 करोनाविरुद्धच्या लढ्याला ५० हजार डॉलर्सचं पाठबळ; भारताच्या मदतीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा पुढाकार
Just Now!
X