Asia Cup 2018 : या स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात बांगालादेशने श्रीलंकेला १३७ धावांनी धूळ चारली. बांगलादेशने मोठ्या फरकाने हा सामना जिकून या स्पर्धेतील आपली विजेतेपदाची दावेदारी अधिक प्रबळ केली. पण सामना बांगलादेशने जिंकला असला, तरी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने मात्र या सामन्यात एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने या स्पर्धेत ३२ बळी मिळवून सर्वाधिक बळी मिळवण्याचा मान पटकावला.

 

लसिथ मलिंगा

सुमारे वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने पुनरागमन केले. या सामन्याच्या पहिल्याच षटकात मलिंगाने आपल्या वेगाचा थरार दाखवत अचूक मारा केला आणि बांगलादेशच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले. त्यानंतरदेखील मलिंगाने सामन्यात आणखी दोन बळी टिपत एकूण चार गडी बाद केले.

या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन हा आतापर्यंत आवळा होता. त्याने ३० बळी मिळवण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. पण हा विक्रम मलिंगाने मोडीत काढला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चार बळी मिळवत मलिंगाने आशिया चषक स्पर्धेत एकूण ३२ बळींची नोंद केली.