पहिल्या दिवसापाठोपाठ कोलकाता कसोटीचा दुसरा दिवसही पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला आहे. पहिल्या दिवशी पावसाच्या खेळखंडोब्याने केवळ ११.५ षटकांचा खेळ झाला. हा वेळ भरुन काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी सामन्याला लवकर सुरुवात करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशीही श्रीलंकेच्या गोलंदाजांचा सामन्यावर वरचष्मा राहिलेला दिसला. अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन आश्विन यांना झटपट माघारी धाडण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश आलं. मात्र चेतेश्वर पुजाराने एका बाजुने भारताची बाजू लावून धरत सामन्यात आपलं आव्हान कायम राखलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा ४७ तर यष्टीरक्षक वृद्धीमान साहा ६ धावांवर नाबाद होता.

श्रीलंकेकडून दुसऱ्या दिवशी दसुन शनकाने २ बळी घेतले. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस चेतेश्वर पुजाराने केलेल्या झुंजार खेळीमुळे भारताने ६५ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी भारतीय संघ श्रीलंकेचा कसा सामना करतो हे पहावं लागणार आहे.

  • पावसाचा जोर न थांबल्याने पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला
  • पंचांनी खेळ थांबवला
  • ९ चौकारांच्या सहाय्याने पुजारा अर्धशतकाच्या जवळ, सामन्यात पुन्हा पावसाचं आगमन
  • पुजाराकडून श्रीलंकन गोलंदाजांचा चांगला सामना
  • मात्र आश्विनला बाद करत शनकाचा भारताला पाचवा धक्का
  • रविचंद्रन आश्विन – चेतेश्वर पुजारा जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • दसुन शनकाच्या गोलंदाजीवर डीकवेलाकडे झेल देत रहाणे माघारी. भारताला चौथा धक्का
  • पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणेचा अडसर दूर करण्यात श्रीलंकेला यश
  • दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात