कोलकाता कसोटीत दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या खेळाडूंनी आपलं वर्चस्व गाजवलं. भारतीय खेळाडूंना पहिल्या डावात १७२ धावांत सर्वबाद केल्यानंतर श्रीलंकेने पहिल्या डावात आश्वासक फलंदाजी केली आहे. अँजलो मॅथ्यूज आणि दिमुथ करुणरत्ने या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करुन श्रीलंकेचं सामन्यावरचं वर्चस्व कायम राखलं. दोनही खेळाडूंनी तिसऱ्या दिवसाच्या खेळात अर्धशतक झळकावलं. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पंचांनी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवला, त्यावेळी श्रीलंकेच्या संघाची अवस्था ४ बाद १६५ अशी होती. भारतावर आघाडी घेण्यासाठी श्रीलंकेला अवघ्या ७ धावांची गरज आहे.

भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळात भारताचे गोलंदाज श्रीलंकेला झटपट बाद करण्यात यशस्वी ठरतात का हे पहावं लागणार आहे.

  • अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवला, तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस श्रीलंका १६५/४
  • अर्धशतकानंतर अँजलो मॅथ्यूज उमेश यादवच्या गोलंदाजीवर झेल देत माघारी
  • श्रीलंकेची सामन्यावर पकड
  • लहिरु थिरीमने ५१ धावांवर बाद, मात्र अँजलो मॅथ्यूजचं झुंजार अर्धशतक
  • कोहलीकडे झेल द्यायला भाग पाडत उमेश यादवने लंकेची जमलेली जोडी फोडली
  • मॅथ्यूज – थिरीमने जोडीची तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी
  • श्रीलंकेने ओलांडला १०० धावांचा टप्पा, थिरीमनेचं झुजार अर्धशतक
  • लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूज जोडीने श्रीलंकेचा डाव सावरला
  • पाठोपाठ समरविक्रमाला माघारी धाडत भुवनेश्वर कुमारचा श्रीलंकेला दुसरा धक्का
  • दिमुथ करुणरत्नेला माघारी धाडत, भुवनेश्वर कुमारचा श्रीलंकेला पहिला धक्का
  • श्रीलंकेच्या सलामीवीरांकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • अखेर गमगेने शमीचा अडथळा दूर करत भारताचा डाव १७२ धावांवर संपवला
  • मोहम्मद शमीच्या फटकेबाजीमुळे भारताने ओलांडला १५० धावांचा टप्पा
  • अखेरच्या जोडीकडून झटपट धावा काढण्याचा प्रयत्न
  • भुवनेश्वर कुमारला माघारी धाडत, सुरंगा लकमलचा भारताला नववा धक्का
  • भारताचे ८ गडी माघारी, श्रीलंकेचं सामन्यात वर्चस्व कायम
  • मात्र दिलरुवान परेराच्या गोलंदाजीवर जाडेजा आणि साहा माघारी
  • दोघांमध्ये ४८ धावांची भागीदारी
  • रविंद्र जाडेजा आणि वृद्धीमान साहा जोडीकडून मैदानात फटकेबाजीचा प्रयत्न
  • चेतेश्वर पुजाराचा त्रिफळा उडवत लहिरु गमगेचा भारताला सहावा धक्का
  • दुसऱ्या बाजूने वृद्धीमान साहाची पुजाराला चांगली साथ, भारताने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • चेतेश्वर पुजाराचं झुंजार अर्धशतक, पुजाराकडून श्रीलंकन गोलंदाजीचा नेटाने सामना
  • पावसाने दुसऱ्या दिवसाच्या खेळावर पाणी फिरवल्यानंतर; तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात