अंधुक प्रकाशाच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने कोलकाता कसोटीत आपला पराभव टाळला आहे. दुसऱ्या डावात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २३१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराट कोहलीच्या शतकाच्या आधारावर भारताने दुसऱ्या डावात ३५२ धावांवर आपला डोव घोषित केला. कोहलीने दुसऱ्या डावात १०४ धावांची शतकी खेळी केली. अखेरच्या दिवशी श्रीलंकेला उरलेली दोन सत्र फलंदाजी करणं भाग होतं. त्यामुळे कोलकाता कसोटी रंगतदार अवस्थेत पोहचली.

अपेक्षेप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भेदक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला. एकामागोमाग एक फलंदाजांना माघारी धाडत भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला बॅकफूटलला ढकललं. दुसऱ्या डावात दिनेश चंडीमल आणि निरोशन डीकवेलाचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने भारतीय गोलंदाजीचा सामना केला नाही. ७ बळी माघारी गेल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने अंधुक प्रकाशाविषयी पंचाकडे तक्रार केली. याचसोबत ड्रेसिंग रुममधून पाणी पिण्याचा बहाणा करत सामन्यात वेळ घालवण्याचा प्रयत्नही केला. मात्र मैदानावरील प्रकाश कमी झाल्याच दिसताच पंचांनी दोनही कर्णधारांच्या सहमतीने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.

  • भारताकडून दुसऱ्या डावात भुवनेश्वर कुमारचे ४ बळी, त्याला मोहम्मद शमीची २ बळी घेऊन चांगली साथ
  • अंधुक प्रकाशाने टाळला श्रीलंकेचा पराभव, कोलकाता कसोटी अनिर्णित
  • दिलरुवान पेरेराचा त्रिफळा उडवत भारताचा श्रीलंकेला सातवा धक्का
  • लंकेचा सहावा गडी माघारी, पाहुण्या संघावर पराभवाचं संकट
  • श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाकडून मोठी भागीदारी रचली गेली नाही
  • श्रीलंकेवर पराभवाचं सावट, भारत सामन्यात वरचढ
  • ठराविक अंतराने कर्णधार दिनेश चंडीमलही माघारी, श्रीलंकेला पाचवा धक्का
  • लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूज माघारी, श्रीलंकेचे ४ गडी माघारी
  • चहापानानंतरही श्रीलंकेची घसरगुंडी सुरुच
  • चहापानापर्यंत श्रीलंकेची अवस्था ८/२, भारत सामन्यात वरचढ
  • पाठोपाठ दिमुथ करुणरत्ना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर माघारी, श्रीलंकेला दुसरा धक्का
  • श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाची अडखळती सुरुवात, समरविक्रमाच भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर माघारी
  • कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये मिळून विराट कोहलीची ५० शतकं, कोलकाता कसोटीला कलाटणी
  • भारताकडून दुसरा डाव ३५२ धावांवर घोषित, श्रीलंकेला विजयासाठी २३१ धावांची गरज
  • लंकेच्या गोलंदाजांचा सामना करत विराट कोहलीचं कसोटी क्रिकेटमधलं १८ वं शतक साजरं
  • विराट कोहलीकडून एका बाजूने लढाई सुरु, भारताने ओलांडला ३०० धावांचा टप्पा, भुवनेश्वर मात्र माघारी
  • लंकेकडून सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न
  • वृद्धीमाना साहादेखील दसुन शनकाच्या गोलंदाजीवर माघारी, भारताला सातवा धक्का
  • शनकाने आश्विनचा त्रिफळा उडवत दिला भारताला सहावा धक्का
  • रविचंद्रन आश्विन-विराट कोहली जोडीमध्ये २० धावांची भागीदारी
  • मात्र पेरेराच्या उसळत्या चेंडूवर जाडेजा झेलबाद, भारताला पाचवा धक्का
  • कोहलीच्या साथीने जाडेजाचा मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न
  • रविंद्र जाडेजाला फलंदाजी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर बढती
  • भारताचे ४ गडी माघारी
  • चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला ठराविक अंतराने माघारी धाडण्यात लकमलला यश
  • श्रीलंकेच्या गोलंदाजांचे भारताला लागोपाठ दोन दणके
  • भारताची सामन्यावर पकड
  • लोकेश राहुलचा त्रिफळा उडवत सुरंगा लकमलचा भारताला दुसरा धक्का
  • कोलकाता कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात