नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेरीस भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. पहिल्या डावात श्रीलंकेला २०५ धावांवर सर्वबाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. यानंतर उरलेल्या सत्रात भारतीय फलंदाजांनी आपल्या डावाची सुरुवात अतिशय सावध रितीने केली. लोकेश राहुलने काही सुरेख फटके लगावत आपला इरादाही स्पष्ट केला. मात्र गमगेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होऊन लोकेश राहुल माघारी परतला. मात्र यानंतर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी अखेरची षटकं खेळून काढत संघाची पडझड थांबवली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ही ११/१ अशी होती.

त्याआधी इशांत शर्मा, रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ कोलमडला. चहापानानंतरच्या सत्रात एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच राहिलं. यामुळे श्रीलंकेच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे उद्याच्या दिवसात भारतीय संघ श्रीलंकेच्या गोलंदाजीला कसा सामोरा जातो हे पहावं लागणार आहे.

Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: रोहित शर्माने तोडला पोलार्डचा मोठा विक्रम, मुंबईसाठी हा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
  • पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताची धावसंख्या  ११ /१
  • पुजारा आणि मुरली विजय जोडीने भारताचा डाव सावरला
  • भारताची खराब सुरुवात, पहिला गडी माघारी. लोकेश राहुल त्रिफळाचित
  • मात्र रंगना हेरथला माघारी धाडत रविचंद्रन आश्विनने श्रीलंकेचा डाव संपवला
  • अखेरच्या फळीतली फलंदाजांचा भारताला झुंज देण्याचा प्रयत्न
  • सुरंगा लकमल इशांत शर्माच्या गोलंदाजीवर माघारी, लंकेचे ९ गडी माघारी
  • कर्णधार दिनेश चंडीमल माघारी, आश्विनचा लंकेला आठवा धक्का
  • ठराविक अंतराने रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर दिलरुवान पेरेरा माघारी, लंकेला सातवा धक्का
  • शनकाचा त्रिफळा उडवत, आश्विनचा श्रीलंकेला सहावा धक्का
  • कर्णधार दिनेश चंडीमलची एका बाजूने झुंज सुरुच, भारतीय गोलंदाजीचा सामना करत संयमी अर्धशतक साजरं
  • निरोशन डिकवेला रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर माघारी, श्रीलंकेला पाचवा धक्का
  • चहापानानंतरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांचं दणक्यात पुनरागमन
  • चहापानापर्यंत श्रीलंकेच्या संघाची परिस्थिती १५१/४
  • दिनेश चंडीमल आणि निरोशन डिकवेलाने श्रीलंकेचा डाव सावरला
  • इशांत शर्माच्या गोलंदाजीवर करुणरत्ने पायचीत, श्रीलंकेला चौथा धक्का
  • लंकेने ओलांडला १०० धावांचा टप्पा, दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी
  • दिमुथ करुणरत्ने-दिनेश चंडीमल जोडीने लंकेचा डाव सावरला
  • लंच टाईमनंतर अवघ्या काही मिनीटातच अँजलो मॅथ्यूज माघारी, लंकेला तिसरा धक्का
  • करुणरत्नेला जीवदान, पहिल्या सत्रापर्यंत श्रीलंका ४७/२
  • मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीत जाडेजाचा तो चेंडू नो-बॉल असल्याचं आढळून आलं
  • रविंद्र जाडेच्या गोलंदाजीवर दिमुथ करुणरत्ने यष्टीरक्षक साहाकडून यष्टीचित
  • मात्र लहिरु थिरीमनेचा त्रिफळा उडवत रविचंद्रन आश्विनचा श्रीलंकेला दुसरा धक्का
  • करुणरत्ने-थिरीमने जोडीकडून लंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • इशांत शर्माच्या गोलंदाजीवर पुजाराकडे झेल देत समरविक्रमा माघारी, लंकेला पहिला धक्का
  • श्रीलंकन सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • दुखापतग्रस्त मोहम्मद शमी संघाबाहेर
  • भारतीय संघात ३ बदल, मुरली विजय, रोहित शर्मा, इशांत शर्माचं संघात पुनरागमन
  • नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय