News Flash

Road Safety World Series: इंडिया लेजंड्ससोबत फायनलमध्ये कोण खेळणार?

आज उपांत्य सामन्यात श्रीलंका लेजंड्स आणि दक्षिण आफ्रिका लेजंड्स भिडणार

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी-२० स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना आज शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल.  श्रीलंका लेजंड्स आणि व दक्षिण आफ्रिका लेजंड्स यांच्यात हा सामना खेळला जाईल. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे, बांगलादेशविरुद्धच्या दणदणीत विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ फॉर्ममध्ये परतला आहे. रविवारी झालेल्या रोमांचक पहिल्या उपांत्य सामन्यात इंडिया लेजंड्सने वेस्ट इंडिज लेजंड्सला 12 धावांनी मात देत अंतिम फेरीत स्थान मिळवले.

भारताविरुद्धचा पराभव सोडला तर, इतर सर्व संघांविरुद्ध श्रीलंकेने शानदार विजय मिळवले आहेत. त्यांनी मालिकेचे चार सामने जिंकले आहेत. तिलकरत्ने दिलशानच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम कागदावर आफ्रिकेपेक्षा बलाढ्य दिसत आहे. स्वत: कर्णधार दिलशान फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

दिलशानची चमकदार कामगिरी

दिलशानने या स्पर्धेत सर्वाधिक 232 धावा केल्या आहेत. यात त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्यापाठोपाठ वीरेंद्र सेहवाग (204), सचिन तेंडुलकर (203) हे फलंदाज आहेत. गोलंदाजीत दिलशानने एकूण 12 विकेट्स घेतल्या आहेत.
दिलशानव्यतिरिक्त उपुरा थरंगानेही आपल्या फलंदाजात चमक दाखवली आहे. 99 धावा ही थरंगाचा या स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. नुवान कुलसेकरा, धम्मिका प्रसाद, अष्टपैलू फरवीज महरुफ आणि अनुभवी फिरकीपटू रंगना हेरथ यांच्यासह दिलशानचा संघ आफ्रिकेविरुद्धच्या लढतीसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकाने बांगलादेशविरूद्ध जो खेळ केला, त्या अनुषंगाने तेसुद्धा या लढतीत फेव्हरिट मानले जात आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर फलंदाज अँड्र्यू पुटिक (नाबाद 82) आणि मॉर्ने व्हॅन विक (नाबाद 69) यांनी अभेद्य भागीदारी रचत 161 धावांचे लक्ष्य पार केले. मात्र, पुटिक वगळता आफ्रिकेचा अन्य कोणताही फलंदाज चमकदार खेळ दाखवू शकला नाही. असे असले तरीही त्यांच्याकडे अल्वारो पीटरसन, जेंडर डी ब्रुने आणि कर्णधार जॉन्टी ऱ्होड्सच्या रूपात अनेक अनुभवी फलंदाज आहेत.

गोलंदाजीतसुद्धा त्यांच्या सर्व खेळाडूंना अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. थंडी सबलाला (4 सामने, 5 विकेट) हा त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याच्याशिवाय, मखाया अँटिनी, मोन्डे जोंडेन्की, पीटरसन आणि गार्नेट क्रूगर यांचा समावेश आहे.

संघ –

श्रीलंका लेजंड्स : तिलकरत्ने दिलशान (कर्णधार), चमारा सिल्वा, दुलंजना विजिनसिंघे, मलिंदा वारनपुरा, सनथ जयसूर्या, उपुल थरंगा, अजंता मेंडिस, धम्मिका प्रसाद, नुवान कुलसेकरा, रंगना हेराथ, थिलन तुषारा, चिंताक जयसिंगे, फरवेज महरूफ, रसेल अर्नाल्ड आणि चमरा कपूगेदरा.

दक्षिण आफ्रिका लेजंड्स : जॉन्टी ऱ्होड्स (कर्णधार), अल्वीरो पीटरसन, लॉयड नॉरिस जोन्स, लूट्स बोसमन, गार्नेट क्रूगर, मखाया अँटिनी, मोन्डे गोंडेकी, नॅन्टी हेवर्ड, रॉजर टेलिमाकस, थंडी सबलाला, जस्टिन केम्प, जेंडर डी ब्रुइन, अँड्र्यू पुटिक, मॉर्ने व्हॅन विक.

सामन्याची वेळ – सायंकाळी 7 पासून.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 10:31 am

Web Title: sri lanka legends will fight south africa legends in semi final of road safety world series adn 96
Next Stories
1 IND vs ENG : रोहित शर्माने १० वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी सूर्यकुमार यादवने खरी ठरवली!
2 IND vs ENG: इंग्लंडविरोधातील विजयाचा शिल्पकार सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
3 ‘सॉफ्ट सिग्नल’वरुन वाद! मला कळत नाही अंपायर ‘I Don’t Know’ सिग्नल का नाही देऊ शकत : विराट कोहली
Just Now!
X