घरच्या मैदानावर भारतीय संघाकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध कसोटीत चांगलं पुनरागमन केलं. मात्र भारताकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी श्रीलंकेच्या संघासमोर आहे. नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.

या दौऱ्यात श्रीलंका भारताविरुद्ध प्रत्येकी ३ कसोटी, वन-डे आणि टी-२० सामने खेळणार आहे. १६ नोव्हेंबरपासून श्रीलंकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

असा असेल भारताचा श्रीलंका दौरा –

पहिली कसोटी – १६ ते २० नोव्हेंबर – ईडन गार्डन्स (कोलकाता)
दुसरी कसोटी – २४ ते २८ नोव्हेंबर – व्हीसीए स्टेडीयम (नागपूर)
तिसरी कसोटी – २ ते ६ डिसेंबर – फिरोज शहा कोटला मैदान (दिल्ली)

पहिली वन-डे – १० डिसेंबर – धर्मशाळा
दुसरी वन-डे – १३ डिसेंबर – मोहाली
तिसरी वन-डे – १७ डिसेंबर – विशाखापट्टणम

पहिली टी-२० – २० डिसेंबर – कटक
दुसरी टी-२० – २२ डिसेंबर – इंदूर
तिसरी टी-२० – २४ डिसेंबर – मुंबई</p>

सध्या भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर भारताला न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. श्रीलंकेत झालेल्या मालिकेत भारताने कसोटी, वन-डे आणि टी-२० सामने लागोपाठ जिंकत मालिकेतले सर्व सामने जिंकले होते. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा वचपा श्रीलंकेचा संघ घेतो का हे पहावं लागणार आहे.