शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया आता श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. पहिला सामना आज रविवारी २५ जुलै रोजी खेळला जाईल. यापूर्वी भारताने एकदिवसीय मालिका २-१ने जिंकली होती. या मालिकेतूनही प्रशिक्षक राहुल द्रविड काही युवा खेळाडूंना आजमावून पाहणार आहे. विशेषत: लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीकडे सर्वांच्या नजरा असतील.

वरुण टीम इंडियामध्ये याआधी दाखल झाला होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत त्याला यावेळी संधी सोडायची इच्छा नाही. टीम इंडिया टी -२० मधील दुसर्‍या क्रमांकाचा यशस्वी संघ आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ टी-२० मधील कमकुवत संघ आहे. संघाने सर्वाधिक टी-२० सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाने वनडेतील कामगिरीची पुनरावृत्ती केली, तर मालिका जिंकण्यात फारशी अडचण येणार नाही.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना कधी सुरू होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना रविवारी २५ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना कुठे होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना कुठे पाहता येईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी -20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी -20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग आपण सोनी लिव्हवर पाहू शकतो.

दोन्ही संघ

भारतः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौथम, कुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डि सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरित असालांका, वानिदू हसरंगा, असीन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथा संदाकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.