News Flash

SL vs IND 2nd T20 : कुठे, कसा आणि केव्हा पाहता येणार लाइव्ह सामना?

मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी 'धवनसेना' प्रयत्नशील

sri lanka vs india 2021 second t20 live streaming where and when to watch
टीम इंडिया

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला करोनाची लागण झाल्यामुळे काल श्रीलंकेविरुद्ध  होणारा टी-२० सामना आज बुधवारी खेळवण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळा़डूंची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या जीवात जीव आला आहे. त्यामुळे आजचा सामना होणार आहे. श्रीलंका दौर्‍यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे. आज मंगळवारी कोलंबोमध्ये दोन्ही संघात दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. यजमान श्रीलंकेसाठी हा सामना करो किंवा मरो असाच आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कधी सुरू होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना बुधवारी २८ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कुठे होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कुठे पाहता येईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-२०सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-२०सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग आपण सोनी लिव्हवर पाहू शकतो.

दोन्ही संघ

भारतः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौथम, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डि सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरित असालांका, वानिदू हसरंगा, असीन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथा संदाकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 3:02 pm

Web Title: sri lanka vs india 2021 second t20 live streaming where and when to watch adn 96 2
Next Stories
1 अल्पवयीन मुलींसोबत Sex Chatting करणाऱ्या इंग्लडच्या खेळाडूला मैदानातूनच अटक; पोलिसांकडून सामना सुरु असतानाच कारवाई
2 Tokyo Olympics : साताऱ्याच्या प्रविण जाधवने सेकंड सीडेड खेळाडूचा पराभव केला पण…
3 के एल राहुलने शेअर केला सराव करतानाचा फोटो; पण चर्चा रंगलीये अथिया शेट्टीच्या कमेंटची
Just Now!
X