News Flash

श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी मालिका : वॉटलिंगच्या अर्धशतकाने न्यूझीलंडला सावरले

तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने ७ बाद १९५ धावा केल्या असून त्यांनी १७७ धावांची आघाडी घेतली आहे.

गॉल : डावखुरा फिरकीपटू लसिथ एम्बुलदेनियाने दिलेल्या सुरुवातीच्या धक्क्यांतून सावरत यष्टिरक्षक फलंदाज बी. जे. वॉटलिंगने झळकावलेल्या झुंजार नाबाद अर्धशतकाने न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तारले.

तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने ७ बाद १९५ धावा केल्या असून त्यांनी १७७ धावांची आघाडी घेतली आहे. वॉटलिंग ६३, तर विल्यम सोमरव्हिल ५ धावांवर खेळत आहे.

दुसऱ्या डावात एम्बुलदेनियाने न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडताना सलामीवीर जीत रावल (४), केन विल्यम्सन (४) व रॉस टेलर (३) यांना बाद केले. टॉम लॅथम (४५) व हेन्री निकोल्स (२६) चांगल्या सुरुवातीचा लाभ घेऊ शकले नाहीत. परंतु वॉटलिंगने टीम साउदीसह (२३) सातव्या गडय़ासाठी ५४ धावा जोडून किवींना महत्त्वपूर्ण आघाडीच्या दिशेने नेले.

त्यापूर्वी, गुरुवारच्या ७ बाद २२७ धावांवरून पुढे खेळताना यष्टिरक्षक निरोशन डिकवेला (६१) आणि सुरंगा लकमल (४०) यांनी आठव्या गडय़ासाठी ८१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचल्यामुळे श्रीलंकेने पहिल्या डावात २६७ धावांपर्यंत मजल मारली.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड (पहिला डाव) : २४९

श्रीलंका (पहिला डाव) : २६७

न्यूझीलंड (दुसरा डाव) : ७६ षटकांत ७ बाद १९५ (बी. जे. वॉटलिंग नाबाद ६३, टॉम लॅथम ४५; लसिथ एम्बुलदेनिया ४/७१).

 

६३*

बी. जे. वॉटलिंग

चेंडू    १३८ चौकार   ५

षटकार ०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 3:34 am

Web Title: sri lanka vs new zealand 1st test day 3 zws 70
Next Stories
1 जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा भर तंदुरुस्ती आणि बचावावर!
2 ऑलिम्पिक पूर्वतयारी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुषांची लढत मलेशियाशी
3 किर्गिऑसवर बंदीची टांगती तलवार