असाद शफीक आणि सर्फराझ अहमदच्या यांच्या शानदार खेळाच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आघाडी घेतली. चौथ्या दिवशी ५ बाद ११८ वरुन पुढे खेळणाऱ्या पाकिस्तानने ४१७ धावांची मजल मारली.
असाद शफीक आणि सर्फराझ अहमदने सहाव्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. सर्फराझचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. त्याने ८६ चेंडूत १३ चौकारांसह ९६ धावांची वेगवान खेळी केली. असादने १३१ धावांची खेळी केली. झुल्फिकार बाबरने ६ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. पाकिस्तानला ११७ धावांची आघाडी मिळाली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात २ बाद ६३ अशी मजल मारली आहे. श्रीलंकेचा संघ अजूनही ५४ धावांनी पिछाडीवर आहे.