कर्णधार दिमुथ करुणारत्ने (७५) आणि लाहिरू थिरिमाने (३९) यांच्या शतकी सलामीच्या बळावर श्रीलंकेने अखेरचा दिवस खेळून काढत दुसरी कसोटी अनिर्णीत राखली आणि वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरी सोडवली.

श्रीलंकेला पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी ३४८ धावांची आवश्यकता होती. शनिवारी करुणारत्ने आणि थिरिमाने यांनी १०१ धावांची दमदार सलामी दिली. त्यामुळे श्रीलंकेने २ बाद १९३ अशी मजल मारली. खेळ थांबला, तेव्हा ओशादा फर्नाडो आणि दिनेश चंडिमल अनुक्रमे ६६ आणि १० धावांवर खेळत होते. विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने पहिल्या डावात १२६ आणि दुसऱ्या डावात ८५ धावा करताना सामनावीर पुरस्कार पटकावला, तर श्रीलंकेच्या सुरंगा लकमलला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

  •  वेस्ट इंडिज (पहिला डाव) : ३५४
  • श्रीलंका (पहिला डाव) : २५८
  • वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ४ बाद २८० डाव घोषित
  • श्रीलंका (दुसरा डाव) : ७९ षटकांत २ बाद १९३ (दिमुथ करुणारत्ने ७५, ओशादा फर्नाडो ६६; कायले मायर्स १/५)
  • सामनावीर : क्रेग ब्रेथवेट.
  •  मालिकावीर : सुरंगा लकमल.