News Flash

श्रीलंका विजयाच्या उंबरठय़ावर

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीलंका-आफ्रिका क्रिकेट मालिका

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. श्रीलंका ऐतिहासिक मालिकाविजयापासून केवळ १३७ धावा दूर असून त्यांचे अजून आठ फलंदाज शिल्लक आहेत.

शुक्रवारी दोन्ही संघांनी एकूण २८२ धावा केल्या, मात्र १८ फलंदाज तंबूत परतले. दोन्ही संघांचे फलंदाज खेळपट्टीवर फारसे टिकू शकले नाहीत. श्रीलंकेने याआधीच्या दरबान कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एक गडी राखून मात केली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतील विजयासह श्रीलंका दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी मालिका विजय मिळवण्याची चिन्हे आहेत. श्रीलंकेला विजयासाठी १९७ धावा करायच्या असून दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या २ बाद ६० धावा झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्याच दिवशी सामना निर्णायक ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:48 am

Web Title: sri lanka win on the threshold
Next Stories
1 ‘पाकिस्तानशी क्रीडा संबंध तोडू नका’
2 अबब! अवघ्या ९ धावांत संघ All Out, ९ गडी शून्यावर बाद
3 पाकला पराभूत करून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या – सचिन तेंडुलकर
Just Now!
X