X

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजावर झाली अँजिओप्लास्टी

IPL विजेत्या संघाचा आहे महत्त्वाचा सदस्य

श्रीलंकेचा महान माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची अँजिओप्लास्टी झाली आहे. मुरलीधरन इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल 2021) सध्याच्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचा एक भाग आहे. एका वृत्तानुसार, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर तो पुन्हा सनरायझर्समध्ये सामील होईल. मुरलीधरन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

मुरलीधरनला आज सोमवारी चेन्नईतील अपोलो रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. जी. सेनगोटुवेलु यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर यशस्वी कोरोनरी अँजिओप्लास्टी झाली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी

2015मध्ये मुरलीधरन आयपीएलमध्ये हैदराबाद संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक झाला. त्याच्या प्रशिक्षकपदाच्या काळात हैदराबादने 2016मध्ये आयपीएलचे जेतेपद जिंकले होते. मुरलीधरन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा आहे, त्याने 800 बळी घेतले आहेत. मुरलीधरनने एकदिवसीय सामन्यात. 534 विकेट्स नोंदवल्या आहेत, त्याशिवाय 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 13 बळी घेतले आहेत.

लंकेचा विक्रमवीर

मुथय्या मुरलीथन कसोटी क्रिकेटमधील घातक गोलंदाजीसाठी ओळखला जात होता. कसोटीत एका डावात सर्वाधिक वेळा 5 विकेट घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. याशिवाय कसोटीत सर्वाधिक वेळा 10 विकेट घेण्याची कामगिरीही त्याने केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कारा जिंकणारा तो  गोलंदाज आहे.

22
READ IN APP
X