07 March 2021

News Flash

आशियासम्राटांचे मायदेशात जल्लोषात स्वागत

दिमाखदार खेळासह आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचे मायदेशात जल्लोषात स्वागत झाले.

| March 10, 2014 04:50 am

दिमाखदार खेळासह आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचे मायदेशात जल्लोषात स्वागत झाले. विमानतळापासून ‘श्रीलंका क्रिकेट मंडळा’च्या कार्यालयापर्यंत एका खुल्या बसमधून संघांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठय़ा प्रमाणावर चाहते उपस्थित होते. श्रीलंकेच्या संघाने सातत्यपूर्ण प्रदर्शनासह स्पर्धेत अपराजित राहण्याची किमयाही केली. वर्षभरापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांचा सहभाग असलेल्या मायदेशात झालेल्या तिरंगी स्पर्धेच्या जेतेपदानंतर हे श्रीलंकेचे पहिलेच जेतेपद आहे. ‘‘संघाच्या विजयाचे श्रेय प्रत्येक खेळाडूच्या मेहनतीला आहे,’’ असे श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 4:50 am

Web Title: sri lankas asia cup 2014 champions given rousing welcome back home
Next Stories
1 मुंबईचा सलग तिसरा विजय राष्ट्रीय हॉकी स्पर्धा
2 आशिया सम्राट!
3 लढवय्या!
Just Now!
X